वाळकी सोसायटीत भाजप पुरस्कृत, कुल समर्थक भैरवनाथ पॅनेलचे वर्चस्व
अनेक वर्षांनंतर सत्तांतर.. कुल समर्थकांचा एकच जल्लोष
राहू (BS24NEWS) वाळकी (ता.दौंड)येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपाचे आमदार राहुल कुल समर्थक भैरवनाथ पॅनेलने एकतर्फी सर्वच्या सर्व तेरा जागा जिंकत संस्थेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात समर्थक संतराज पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. विकास संस्थेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झाली होती त्यामध्ये अखेर राहुल कुल गटाने आपला झेंडा फडकावत सोसायटीवरून थोरात गटाला पाय उतार केले. मतदानाप्रसंगी किरकोळ बाचाबाचीचे प्रकारही घडले होते यवत पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता विजयानंतर भैरवनाथ पॅनलच्या सर्व समर्थकांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली.
संतराज पॅनेलचे नेतुत्व माजी सभापती बाळासाहेब थोरात,पोपट थोरात, भरत काळे, नानासो हाडगर काका तापकीर, राजेंद्र जोधंळे,दत्तात्रय चोरमले आदीनी केले.
भैरवनाथ पॅनेलचे नेतुत्व सुधाकर थोरात, बाळासाहेब थोरात, उत्तम थोरात, संभाजी थोरात, श्रीरंग थोरात, अरुण सांळुखे, संदीप भालेराव, नाना चोरमले, आदीनी केले.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे गणेश जयसिंग थोरात, बाळासाहेब बापूराव थोरात, उत्तम जयसिंग थोरात, विठ्ठल आनंदराव थोरात, शांताराम ज्ञानदेव साळुंखे, महेंद्र वाल्मीक थोरात, महादेव राजाराम चोरमले, विराज बाबा काळे, संपत शंकर चोरमले, हिरामण मारुती शिंदे, सुरेश दत्तात्रय भालेराव, अश्विनी मनोज थोरात, बबई दौलत थोरात (सर्व भैरवनाथ पॅनल)