Daund Breaking – बहुचर्चित तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या मेगा ब्लॉकला परवानगी – आमदार राहुल कुल
केंद्रीय रेल्व राज्यमंत्री रावसाहेब पाटिल दानवे यांच्याबरोबरील झालेल्या बैठकीला यश
दौंड (BS24NEWS) दौंड शहारातील तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या रेल्वेच्या मेगा ब्लॉकला परवानगी मिळाली असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली.
याबाबत माहिती देताना आमदार कुल म्हणाले की, मागिल दहा दिवसांपूर्वी रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटिल दानवे यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत रेल्वेच्या अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. यामधे दौंड शहारातील तिसऱ्या कुरकुंभ मोरिचे काम बंद आहे. याची सविस्तर चर्चा झाली या बैठकीत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटिल दानवे यांनी हे काम तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या व याबाबात आमदार राहुल कुल हे आढावा घेतील असेही सांगितले होते त्याप्रमाणे तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामासाठी रेल्वेच्या मेगा ब्लॉकची परवानगी आवश्यक होती त्यानुसार आमदार कुल यांनी याबाबत सोलापूर डीआरएम गुप्ता यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार रेल्वेने तिसऱ्या मोरीच्या कामासाठी मेगा ब्लॉक जाहीर केला असल्याची माहिती आमदार कुल यांना भ्रमण ध्वनीव्दारे सोलापूर डीआरएम गुप्ता यांनी दिली.
दौंड शहराची मुख्य बाजारपेठ व गावठाणाला जोडण्याकरिता आणि वाहतूक कोंडी टाळण्याकरिता पूर्वीच्या दोन कुरकुंभ मोरी शेजारील प्रस्तावित तिसऱ्या कुरकुंभ मोरी केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने १६ कोटी ५० लाख रुपये प्रकल्प खर्च असलेल्या या प्रकल्पास १ ऑगस्ट २०१३ रोजी मंजुरी दिली. प्रस्तावित तिसरी कुरकुंभ मोरी ही २४.६० फूट रुंद व १२.७९ फूट उंच, अशी ही आहे. काँक्रिटचे तयार बॉक्स लोहमार्गाखालुन पुशिंग करून हा भुयारी मार्ग केला जाणार आहे.
रेल्वेच्या मेगा ब्लॉकला मंजुरी मिळाल्याने रखडलेले काम लवकरच मार्गी लागले असल्याचे ही कुल यांनी सांगितले.
इतरही मागण्यांबाबत राज्यमंत्री दानवे सकारात्मक :- दौंड ते लोणावळा लोकल, पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाइन जोडणीच्या डिपोजीट वर्क कामास परवानगी, दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या मेमु लोकलचे दर पूर्वीप्रमाणे २० रूपये करावेत, पुणे – हैद्राबाद – पुणे (AC सुपर फास्ट), मुंबई – चेन्नई – मुंबई सुपरफास्ट, LTT – विशाखा पट्टणम सुपर फास्ट आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दौंड स्थानकात थांबा दयावा, वाढती लोकसंख्या व नागरीकिकरण लक्षात घेता पुणे – दौंड रेल्वे ट्रॅक चे चौपदरीकरण करावे व यवत आणि उरुळी च्या मध्ये सहजपुर, उरुळी आणि लोणीकाळभोर च्या मध्ये नायगाव, मांजरी आणि हडपसर च्या मध्ये अमनोरा आदी नवीन स्थानकांची निर्मिती करावी आदी मागण्याबाबत देखील राज्यमंत्री रावसाहेब दानवे सकारात्मक असून पुढिल काळात त्यावर देखील कार्यवाही होईल असे आमदार कुल यांनी सांगितले.