गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांवर एन.डी.पी.एस. कायदया अंर्तगत कारवाई — पोलिस निरिक्षक नारायण पवार
दौंड (BS24NEWS)
पुणे – सोलापुर राष्ट्रीय महामार्गालगत कासुर्डी (ता. दौंड) येथे पावणे दोन लाख रुपयांच्या गांजाची तस्करी करणाऱ्या पुण्यातील दोन जणांना यवत पोलीसांनी छापा टाकून अटक केली असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. याप्रकरणी संदीप मधुकर चव्हाते ( वय २७) व अक्षय सतीश जाधव ( वय २४, दोघेही रा. कोथरूड , पुणे ) यांना अटक केली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे सोलापुर महामार्गालगत कासुर्डी (ता.दौंड) हद्दीत गांजाची तस्करी होत असल्याची माहिती यवत पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत सोमवारी ( दि.३) रोजी हॉटेल नुरच्या पाठीमागे रोडच्या कडेला मोटार सायकल (नंबर एम.एच १२ क्यु.के. ७२२८ ) वरून १ लाख ८४ हजार २१२ रूपये किंमतीचा १०.२३४ किलो
वजनाचा गांजा बेकायदेशीररित्या वाहतुक करीत असताना सापळा रचून
मधुकर चव्हाते व अक्षय सतीश जाधव
यांना पोलीसांनी मुद्देमालासह या दोघांना ताब्यात घेतले असून पोलीस शिपाई सागर क्षिरसागर यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी अक्षय जाधव यांच्याकडे विचारपूस करत तपास केला असता त्याने हा गांजा विक्री करीत आणला असल्याचे कबुल केले असुन सदरचा गांजाचा माल हा समीर चंदुलाल परदेशी ( वय ३० वर्षे रा. मेनरोड करमाळा जि. सोलापुर) याचेकडुन विकत घेतल्याचे सांगितल्याने आरोपी नसमीर चंदुलाल परदेशी यास अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर एन.डी.पी.एस. कायदया अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या तीनही आरोपींना दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरिक्षक नारायण पवार करीत आहेत.