दौंडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीच्या कामाची व ऑक्सिजन काँस्ट्रेटर यंत्रणेची आमदार राहुल कुल यांच्याकडून पाहणी
दौंड (BS24NEWS) दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीच्या कामाची व ऑक्सिजन काँस्ट्रेटर यंत्रणेची पाहणी आमदार राहुल कुल यांनी केली.
दौंड तालुक्यातील गोरगरिब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा, वैद्यकीय चाचण्या माफक दरात उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे दौंडचे आमदार राहुल कूल यांनी पाठपुरावा करून सन २०१८ साली दौंड उपजिल्हा रुग्णालयातील ५० खाटा वरून १०० खाटांच्या रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन व विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे ३३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधीस मान्यता मिळाली होती. सध्या दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे बांधकामास सुरुवात झाली असून हे काम वेगाने प्रगतीपथावर असुन या कामाची पाहणी आमदार राहुल कुल यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह केली.
तसेच कोव्हीड काळात रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये आलेली आव्हाने लक्षात घेता दौंड उपजिल्हा रुग्णालयामध्ये मेडिकल ग्रेड ऑक्सिजन काँस्ट्रेटर यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचेकडे आमदार राहुल कुल यांनी केली होती. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे सुमारे ४१ लक्ष रुपये खर्चाची ऑक्सिजन काँस्ट्रेटर यंत्रणा कार्यान्वयीत करण्यात आलेली आहे.
या ठिकाणी हि आमदार राहुल कूल यांनी भेट देत माहिती घेतली.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियांता हरिश्चंद्र माळशिकारे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया , भाजपा युवकचे तालुकाध्यक्ष बाप्पु भागवत, अमोल काळे, आदी यावेळी उपस्थित होते.