दौंडमध्ये घडलाय अनोखा उपक्रम मनसेच्या वतीने मुस्लिम बांधवांचा सत्कार
दौंड (BS24NEWS) – दौंड येथे मनसेच्यावतीने मज्जिदच्या ट्रस्टिंचा सत्कार करण्यात आला आहे. सध्या राज्यात भोंग्यावरून राजकारण तापले आहे. यामधे आज मनसेच्यावतीने दौंड शहरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र तत्पूर्वीच दौंड शहरातील मज्जिदच्या ट्रस्टिंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंतची अजान देण्यात येईल असे जाहीर केल्याने आज दि.४ रोजी दौंड पोलिसांत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरिक्षक विनोद घुगे, मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान, माजी नगराध्यक्ष बादशहा शेख, व मुस्लीम समाजातील बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना मनसेचे तालुकाध्यक्ष म्हणाले की, दौंड शहरातील सर्व मज्जिदच्या ट्रस्टीनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच अजान देता येईल असे सांगितल्याने आम्ही आजची आरती रद्द केली असुन या मज्जिदच्या ट्रस्टीचा मनसेच्या वतीने सत्कार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.