राजेगाव सोसायटीवर आमदार राहुल कुल सर्मथक श्री राजेश्वर जनसेवा पॅनेलचे वर्चस्व
भारतीय जनता पार्टीचे अकरा उमेदवार विजयी, राष्ट्रवादीचे फक्त दोन तर प्रहारच्या हाती भोपळा.
दौंड (BS24NEWS) – राजेगाव, ता. दौंड येथील विकास सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये श्री. राजेश्वर जनसेवा पॅनेल व जय राजनाथ सहकार पॅनेला आणि श्री राजेश्वर जनशक्ती पॅनेला असे तीन पॅनेल निवडणुकीच्या रीगणात होते .मात्र यावेळी श्री राजेश्वर जनसेवा पॅनेलची विजयाची वर्णी लागली आहे. या विकास सेवा संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकित भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्री राजेश्वर जनसेवा पॅनेलचे तेरा पैकी अकरा उमेदवार निवडून आले आहे. तर जय राजनाथ सहकार पॅनेला दोन जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर तिसऱ्या श्री. राजेश्वर जनशक्ती पॅनेला एकही जागा मिळाली नाही.
यामध्ये विजयी उमेदवार:- इतर मागास प्रवर्गातून जाधव रमेश भीमराव, महिला प्रतिनिधीतून जयश्री अकृर मोरे, वर्षा मुकेश मोरे, अनुसूचित जाती / जमाती विठ्ठल भाऊसाहेब मोघे, सर्व साधारण कर्जदार गट – मयुर पोपट गुणवरे, अमोल मालोजी मोरे, गोविंद गोपाळा कडू , भाऊ कांतीलाल ढेंबरे, अप्पासाहवेब बाबुराव मेंगावडे, राजेंद्र वामन खैरे, शरद कल्याण मेंगावडे, मधुकर धोंडिबा जांमले, भटक्या विमुक्त जाती जमाती – संदीप पोपट टेंगले हे विजयी उमेदवार आहेत.
श्री राजेश्वर जनसेवा पॅनेल नेतृत्व मुकेश गुणवरे, भरत खराडे, महेश कडू, मनोज भोसले, मालोजी मोरे, महादेव बागडे, चंद्रकांत मोरे, शहाजी गुणवरे, सचिन खैरे हे करत होते. दौंड तालुक्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते भाजप चे विजयी उमेदवार अकरा निवडून तर राष्ट्रवादी पक्षाला फक्त दोन जगावर समाधान मानावे लागले आहे आणि प्रहार पक्षाला एकही जागा घेता अली नाही. पराभाव झालेले राष्ट्रवादीचे बलाढ्य विद्यमान सरपंच प्रवीण लोंढे ,विद्यमान चेअरमन सचिम जाधव यांचा जिव्हारी लागला आहे.