राजकीय
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी वैशाली नागवडे
दौंड(BS24NEWS)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार डॉ.फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रत्येक विभागात महिला अध्यक्ष नेमण्याचा निर्णय झाला असून त्या निर्णयानुसार पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या अध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. नागवडे यांनी यापूर्वी महानंदाचे अध्यक्षपद, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष पद व राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला आघाडीचे सरचिटणीस पद या पदावर काम केले आहे.