प्राचार्य डॉ अविनाश सांगोलेकर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व – रमेश थोरात
राहू (BS24NEWS)
प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून तो एक चमकणारा ज्ञानाचा हिरा आहे,” असे प्रतिपादन भैरवनाथ शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात यांनी केले.
येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी बोलताना थोरात पुढे म्हणाले की , उच्च शिक्षणाचा महाविद्यालयरुपी रथ २००९ – २०१० पासून चालवत असताना आम्हांला अनेक अडचणी येत गेल्या. त्यातून २०१७ साली हे महाविद्यालय बंद पडते की काय, अशी समस्या निर्माण झाली होती. मात्र ह्या समस्येवर मात करीत २०१७ ते २०२२ ह्या कालावधीत महाविद्यालयानं आश्चर्यकारक प्रगती केली.त्याचे श्रेय प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांना जाते.
ह्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रसिद्ध कवी भरत दौंडकर ह्यांनी प्राचार्य डॉ.सांगोलेकर ह्यांचे मराठी गझलेतील योगदानावरही प्रकाश टाकला आणि त्यांची ‘ माणूस मारणारे ते लोक कोण होते ? ‘, ही प्रसिद्ध गझलही सादर केली.
यावेळी विद्यार्थी किरण गायकवाड,ऋतुजा दिक्षित,आदिनाथ नातू,शीतल लोंढे,स्नेहा विश्वासराव, प्रतीक्षा जाधव,आरती पवार,ऋषिकेश पवार,आदेश जाधव व स्वेता मोहळ,दीप्ती सातव,अक्षदा थोरात,आरती सुतार, निखिल होले,निलेश थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ.प्रा.गोविंद राजेंनिंबाळकर,जेष्ठ कवी भरत दौंडकर,भाऊसाहेब ढमढेरे, सूर्यकांत खैरे, प्रा.विकास टकले,डॉ. जगदीश आवटे,डॉ. नंदकुमार जाधव,डॉ. भाऊसाहेब गव्हाणे, कल्याणराव ढमढेरे,प्रा. धनंजय भिसे,अरुण थोरात,भापकर गुरुजी,मनोज थोरात,नानासाहेब थोरात,अनिल सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन निखिल होले यांनी तर सूत्रसंचालन डॉ. मल्हारी मसलखांब यांनी केले.