कुरकुंभ मोरीच्या पुशींगच्या कामाला उद्यापासून सुरुवात आमदार राहुल कुल यांनी केली पाहणी
दौंड (BS24NEWS)
तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या मेगा ब्लॉक ची परवानगी केंद्रीय रेल्व राज्यमंत्री रावसाहेब पाटिल दानवे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीमुळेच मिळालेली असल्याचे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. ते दौंड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार राहुल कुल पुढे म्हणाले की, मागिल काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटिल दानवे यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत दौंड शहारातील तिसऱ्या कुरकुंभ मोरिचे काम बंद आहे. याची सविस्तर चर्चा झाली या बैठकीत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटिल दानवे यांनी हे काम तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या व याबाबात मला आढावा घेण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामासाठी रेल्वेच्या मेगा ब्लॉकची परवानगी आवश्यक होती ती मिळाली असुन उद्यापासून पुशिंग चे काम सुरु होणार आहे. या कामाची पाहणी आज जावून केली असून हे काम मे अखेर पुर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दौंड शहराला जोडणाऱ्या दौंड गार पुलाचे काम ही सुरू झाले आहे. दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे कामही सद्या प्रगतीपथावर आहे. दौंड शहराला क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध नव्हती ती जागा उपलब्ध होऊन तेथे कामास सुुरवात झाली आहे. शहरातील सत्ता प्रकार ब च्या जागांबाबत असणारी प्रक्रिया पुर्ण झाली असुन शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता शहराला पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर केली असुन आत्ता शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची क्षमता वाढविणे गरजेचे असून ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक प्रेमसुख कटारिया, माजी नगराध्यक्षा शितल कटारिया, भाजपचे शहराध्यक्ष फिरोज खान, गटनेते बबलु कांबळे, भाजपाचे व्यापारी आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष स्वप्निल शहा, माजी नगरसेविका अरुणा डहाळे आदी यावेळी उपस्थित होते.