दौंड तालुक्यातील कालवा दुरुस्तीची कामे लवकरच मार्गी लागणार
मलठण (BS24NEWS) खडकवासला पाटबंधारे विभाग शाखा भिगवण यांच्याकडूनी दौंड तालुक्यातील कालवा दुरुस्तीची कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.
हेही वाचा – पीएमआरडीएमुळे वाढणाऱ्या निवासी क्षेत्रासाठी मुळशीच्या पाण्याचे नियोजन करा — आ.राहुल कुल
दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नामुळे व वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील कालवा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या दुरुस्तीपूर्वी लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी संबंधित विभागाला बैठक बोलवण्याची सूचना आमदार कुल यांनी केली होती.
त्या अनुषंगाने भिगवण शाखा किमी 0-20 मधील सर्व वितरिका मधील शेतकऱ्यांची बैठक दि. 11 रोजी पाटबंधारे शाखा बोरीबेल या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीला दौंड तालुका उपविभागीय अधिकारी डी. बी. पाटील व शाखाधिकारी फसले यांनी लाभ क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी व सूचना लेखी स्वरूपात जाणून घेतल्या. कालव्यावर नवीन पूल बांधणी त्याचबरोबर जागोजागी झालेली पडझड तसेच ठिकाणी होणारी पाण्याची गळती अशा विविध समस्यांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
हेही वाचा – पश्चिम महाराष्ट्राच्या ज्वलंत पाणी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आमदार राहुल कुल यांचे साकडे
याप्रसंगी बोरोबेल गावचे सरपंच नंदकिशोर पाचपुते, माजी सरपंच दत्तात्रेय जेडगे, सेवानिवृत्त दुय्यम निबंधक शिवराम गिरमकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाचपुते, गणेश गायकवाड, दत्तात्रेय खळदकर, मोतीराम खळदकर आदी शेतकरी उपस्थित होते.