राष्ट्रीयविशेष बातमी
पेट्रोल 9.5 रुपये तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त , केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत केली घोषणा
मुंबई(BS24NEWS)
मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरून विरोधकांनी ओरड सुरू केली होती. अशातच आज मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपये कपात करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करुन ही घोषणा केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की ,आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपयांनी कमी करीत आहोत. यामुळे पेट्रोल ९.५ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे, याशिवाय एलपीजी गॅस सिलेंडरवरही २०० रुपये अनुदान देण्याची घोषणाही केली आहे.