राज्याचे उपमुख्यमंत्री व साखर धंद्यातील तज्ञ अजित पवार यांनी अतिरिक्त ऊसाचे गौडबंगाल स्पष्ट करावे -भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे
यवत (BS24NEWS)
सध्या राज्यात आज आखेर अतिरिक्त ऊस 17 लाख मेट्रिक टन शिल्लक असल्याचे राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे राज्य सरकारच्या विरोधात साखर आयुक्त यांचे कार्यालयासमोर भाजपा किसान मोर्चाच्या वतीने (दि.५ ) मे रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व साखर आयुक्त यांनी दि.५ मे रोजी राज्यात २८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपा विना शिल्लक असल्याचे आंदोलनस्थळी जाहीर केले होते. त्याचबरोबर राज्यातील एकही टन ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही असेही अस्वस्थ केले होते. त्यांच्या नियोजनानुसार प्रतिदिनी दीड ते दोन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप सुरू असल्याचे सांगण्यात आले ( दि.५) मे ते आज अखेर सरकारी आकडेवारीनुसार सरासरी १.५०(दिड लाख मेट्रिक टन) ऊसाचे गाळप झाले असेल तर १८ दिवसात जवळपास राज्यातील सर्व ऊसाचे गाळप झाले असते परंतु या निमित्ताने यांची लबाडी उघड होताना दिसत आहे. आजही राज्यात सरकारच्या म्हणण्यानुसार १७ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे.याचा अर्थ राज्यातील सरकार ऊस उत्पादकांना उध्वस्त करण्याचे काम करत आहे कि काय? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
दि.५ मे रोजी आंदोलना वेळी आम्ही राज्य सरकारला राज्यात ५० ते ५५ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असल्याचे सांगितले होते.परंतु निव्वळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने वेळीच आवश्यक उपाययोजना करायला हव्या होत्या त्या न केल्यामुळे राज्यात ऊस उत्पादकांच्या आत्महत्येला सुरवात यांच्याच काळया कारकिर्दीने झाली. बिड जिल्ह्यातील हिंगणगाव येथील अल्पभूधारक शेतकरी नामदेव जाधव यांने स्वतः चा ऊस पेटवून त्याच ऊसामध्ये फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
आमचा या निमित्ताने राज्य सरकारला आणि विशेष करून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि साखर धंद्यातील तज्ञ अजित पवार यांना जाहीर सवाल आहे की आम्ही मागणी केलेल्या अतिरिक्त गाळपाविना शिल्लक राहिलेल्या ऊसाला हेक्टरी ७५ हजार रुपये अनुदान, अतिरिक्त वाहतूकीसाठी सरकारने ५ रुपये प्रति टन प्रति किलोमीटर चे अनुदान आणि ज्या शेतकऱ्यांचा ऊस जळीत करून गाळप केला त्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायला आणखी किती शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची आपण वाट पाहत आहात ?हे देखील स्प्ष्ट करावे.
आमचा आजही खात्रीपूर्वक दावा आहे की आज अखेर राज्यात जवळपास ३०लाख मेट्रिक टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे त्यामुळे राज्य सरकारने या अतिरिक्त ऊसाचे गौडबंगाल एकदा स्पष्ट करावे असे मत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मांडले आहे.