बिबट्याच्या हल्ल्यात 26 मेंढ्या ठार ,मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान…
राहु (BS24NEWS) दौंड तालुक्यातील दहिटणे येथील शिंदेमळा परीसरातील मेंढपाळांच्या पालावर भर दिवसा बिबट्याने हल्ला करून सुमारे २६ मेंढ्यांचा फडशा पाडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास घडली.घटनेत सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दौंड तालुक्यातील पडवीच्या सोहम मांढरे याने रोवला यशाचा झेंडा
याबाबत सविस्तर माहिती अशी की,दहिटणे गावानजीक असलेल्या शिंदेमळा येथे मेंढपाळ संपत सोमनाथ थोरात व नवनाथ यशवंत बोरकर यांचा वाडा शेतकरी दिगंबर मगर यांच्या शेतात मुक्कामी होता.मेंढपाळ बकऱ्यांना चारा चारण्यासाठी घेऊन इतर ठिकाणी गेले असता शुक्रवार (दि.२७) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मेंढपाळ यशवंत बोरकर यांंची अकरा तर संपत सोमनाथ थोरात यांंची पंधरा मेंढ्यावर हल्ला चढवला.बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एकूण 26 छोट्या-मोठ्या मेंढ्या जागीच ठार झाल्या.
रेल्वेमध्ये बॅग लिप्टींग व मोबाईल चोरी करणारी आंतराराज्य टोळी जेरबंद
घटनेचा पंचनामा यवतचे वनपाल गणेश पवार,वनरक्षक शिवकुमार बोंबले,विलास होले,वन कर्मचारी सहकारी यांनी केला आहे. यावेळी युवा नेते बाळासाहेब शिंदे,सरपंच दादासाहेब कोळपे,मिरवडीचे सरपंच सागर शेलार,यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठीच्या उपाययोजना तसेच संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी वन खात्याकडे केली आहे.