रेल्वेमध्ये बॅग लिप्टींग व मोबाईल चोरी करणारी आंतराराज्य टोळी जेरबंद
दौंड(BS24NEWS)
रेल्वे मध्ये बँग लिप्टींग व मोबाईल चोरी करणारी आंतराराज्य टोळी दौंड पोलिसांकडून दौंड शहरात जेरबंद करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यभरात रेल्वे मध्ये धुमाकूळ घातलेल्या व बऱ्याच दिवसांपासून फरार असलेल्या हरियाणा व दिल्ली येथे राहणाऱ्या सहा जणांची टोळी दौंड मध्ये असल्याची बातमी दौंड पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाली होती.त्यानुसार त्यांनी दौंड पोलिस स्टेशनची एक टिम पाठवून शहरातील गोवागल्ली ,नेहरू चौक येथून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले .
त्यांना दौंड पोलिस स्टेशन येथे आणले असता त्यांनी मुंबई, वसई-विरार येथील एकुण रेल्वे हद्दीतील पाच चोरीचे गुन्हे सांगितले असून पुर्ण राज्यात जास्तीत जास्त चोरीचे गुन्हे उघडीस येण्याची शक्यता आहे. यामध्ये आरोपी विनोद सतबीरसिंग (वय-35 वर्षे , रा. हिसार, हरियाणा ), राकेश महावीर( वय-45 वर्षे, रा. हरियाणा) ,महिंद्र सोनु मुन्शीराम (वय-52 वर्षे, रा. दिल्ली), हौंसराज दुपसिंग (वय-33 वर्षे, रा. हरियाण) ,दिपक सुनव राकेश ( वय-29 वर्षे, रा. हरियाणा ) ,राजेन रोशन कुमार ( वय-32 वर्षे, रा.हरियाणा) अशी ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारांची नावे असून त्यांच्याकडून रोख रक्कम 23,000 रूपये व वेगवेगळ्या कंपनीचे सात मोबाईल हॅण्डसेंट, आयडीया व जिओ कंपनीचे 48 नवीन सिमकार्ड तसेच बँग लिप्टींग करण्याकरीता लागणारे साहित्य त्याच्या मध्ये छोटा कटर, ब्लेड, पक्कड, डुब्लीकेट चावी असे साहित्य त्यांच्या बॅग मध्ये मिळुन आले .
या आरोपींना मुंबई रेल्वे पोलिस भाईदर युनिट 7 यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख , मिलिंद मोहिते, अप्पर पोलिस अधिक्षक राहुल धस दौंड उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली दौंड पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शहाजी गोसावी, पोलिस हवालदार पाडुरंग थोरात, सुभाष राऊत, महेश भोसले, पोलिस निरीक्षक अमोल गवळी, नारायण वलेकर, पोलिस कॉन्स्टेबल किशोर वाघ, अभिजीत गिरमे, निलेश वाकळे, चालक पोलिस हवालदार देसाई यांनी सदरची कामगिरी केली आहे.