क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण

मुदतबाह्य चॉकलेट वापरणाऱ्या दौंड तालुक्यातील गुऱ्हाळावर अन्न व औषध प्रशासनाने केली कारवाई

राहु(BS24NEWS)
अन्न व औषध प्रशासनाने मुदतबाह्य चॉकलेट वापरणाऱ्या दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ चालक उस्मान मयूर यांच्यावर नमुने घेणे आणि जप्तीची कारवाई केली आहे.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात २०११ पासून लागू झालेला असून जनतेस सुरक्षीत, सकस व निर्मळ अन्न पदार्थ उपलब्ध करून देणे हा कायद्याचा उद्देश आहे. प्रशासनाने मागील काही कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये काही गुळ उत्पादक चुकीच्या मार्गाने गुळ उत्पादन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतीत कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केल्यानंतरही चुकीचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाल्यावरून दौंड तालुक्यातील राहु येथे ही कारवाई करण्यात आली.
राहु (ता. दौंड) येथील गुऱ्हाळवर अचानक धाड टाकली असता तेथे मुदतबाह्य व खाण्यास अयोग्य चॉकलेट वापरून विनापरवाना गुळ उत्पादन करीत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यांच्याकडून गुळ व मुदतबाह्य चॉकलेट या पदार्थाचे दोन नमुने घेउन ८९८ किलो व ९९८ किलो मुदतबाह्य चॉकलेट असा एकूण ५२ हजार ६८८ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. सदर कार्यवाही सहायक आयुक्त (अन्न) संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर प्रकरणी तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटी प्रकरणी नियमानुसार कारवाई घेण्यात येत असून विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्याअंतर्गत तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल. सर्व गुऱ्हाळ चालक- मालकांना परवाना घेवूनच कायद्याअंतर्गत सर्व तरतुदींचे पालन करुनच गुळ उत्पादन करण्याचे आवाहन सह आयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!