पुणे जिल्हा ग्रामीण
दौंड शहरात दमदार पावसाचे आगमन
दौंड(BS24NEWS)
दौंड शहरात आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास भुरभूर पावसाला सुरुवात झाली . तो पाऊस ५ मिनिटे पडला व पुन्हा पावसाने उघडीप दिली. त्यानंतर सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला . यामुळे शहरातील रस्त्यांवरून धो धो पाणी वाहू लागले असल्याचे चित्र पाहायला मिळाले.मागील दोन दिवसापासून प्रचंड उकाडा सहन करणाऱ्या नागरिकांना सुरू झालेल्या पावसामुळे हवेत थंडावा निर्माण झाल्याने दिलासा मिळालेला आहे.