जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी अध्यापन तंत्रामध्ये अमुलाग्र बदल केल्यामुळे शाळांनी जोर धरला – आ. राहुल कुल
राहु(BS24NEWS)
इंग्रजी माध्यम खासगी शाळा व जिल्हा परिषद शाळा यांच्यामध्ये कमालीची स्पर्धा सुरू असून जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी अध्यापन तंत्रामध्ये अमुलाग्र बदल केल्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळानी पुन्हा जोर धरला असल्याचे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले
शिंदेनगर (राहू), ता. दौंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बाळकृष्ण थोरात यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने शाळा व्यवस्थापन समिती शिंदेनगर व दौंड तालुक्यातील शिक्षक बांधवांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार कुल बोलत होते.
सुमारे ३४ वर्षांहून अधिक सेवा करत,पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बाळकृष्ण थोरात यांचा आदर्श इतर शिक्षकांनी घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, भाजपा तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नवले, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बापू भागवत, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अभिमन्यू गिरमकर, राहूचे सरपंच दिलीप देशमुख, उपसरपंच गणेश शिंदे, भिमा पाटसचे संचालक तुकाराम ताकवणे, चंद्रकांत नातू, शिक्षक नेते आप्पासाहेब कुल, विकास शेलार, शांताराम जगताप, कर्मयोगी सुभाष आण्णा कुल शिक्षक सोसायटी चेअरमन अनिल नवले,संजय लोहार, ओंकार थोरात व ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.