भविष्यातील गरज ओळखून इथेनॉल निर्मितीवर भर द्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे साखर कारखानदारांना आवाहन
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या सीबीजी प्रकल्पाचे उद्घाटन व कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रम उत्साहात संपन्न
राहू (BS24NEWS) देशाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन साखरेच्या उत्पादनातून साखरेचे इथेनॉलमध्ये रूपांतर करण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन साखर कारखानदार, उद्योजकांना केले. सद्यस्थितीप्रमाणे केवळ साखर उत्पादनाकडेच लक्ष दिले तर आगामी काळात ते उद्योगासाठी संकटकाळ ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पाटेठाण (ता.दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या सीबीडी प्रकल्पाचे उद्घाटन व कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री गडकरी म्हणाले की,सध्या आपल्याकडे तांदूळ, मका,आणि साखरेचे अतिरिक्त उत्पादन आहे, ब्राझीलमध्ये दुष्काळ पडल्यामुळे साखर उद्योगाला झळाळी मिळाली मात्र असे सातत्याने घडेल असे सांगता येत नाही याची आठवण करून देत गडकरी म्हणाले की,साखरेचे उत्पादन कमी करणे आणि इथेनॉलचे उत्पादन वाढवणे हे आपल्या भविष्यासाठी चांगले आहे. ग्रीन हायड्रोजन हे देशाच्या ऊर्जेची गरज पूर्ण करणारे इंधन असून याकडेही लक्ष देण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली.
संघाचा संस्कार हेच जीवनाची पुंजी आहे तर दिन दलित लोकांना परमेश्वर मानुन सेवा करायला दीनद्याल उपाध्याय यांनी सांगितले हेडगेवार गुरूजीच्या राष्ट्रनिर्माण व स्वदेशी विचाराने प्रेरित होऊन संघाचा एक स्वयंसेवक म्हणून पांडुरंग राऊत यांनी पाटेठाण व परिसरामध्ये चांगल्या प्रकारे काम करत जनउपयोगी काम केल्यामुळे नितीन गडकरी यांनी पांडुरंग राऊत यांचे कौतुक केले. साखर कारखान्यांनी आपल्या कारखान्यांमध्ये आणि इतर भागात इथेनॉल पंप सुरू करण्याचे आवाहन करतो, ज्यामुळे 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या स्कूटर, ऑटो रिक्षा आणि कार बाजारात मोठ्या प्रमाणात येतील. तसेच इथेनॉल वापरामुळे प्रदुषण कमी होईल आणि स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती होईल
माझ्या पत्नीनंही याविषयी प्रश्न विचारला. तेव्हा आपल्यात आणि जनतेत अंतर खुप आहे हे समजलं. मी नंतर टोयोटाची भविष्य ही गाडी आणली. मी दिल्लीत हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडीत फिरतो आणि लोकांनाही दाखवतो. ग्रीन हायड्रोजन आपल्याकडे लाऊन जनरेटर बसवायचा. त्यातून हायड्रोजन तयार होईल.
याप्रसगी अमृत महोत्सव समिती अध्यक्ष, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, दौंडचे आमदार राहुल कुल, शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष दिंगबर दुर्गाडे, हभप सुमंत हंबीर,सुरेश महाराज साठे,माधव राऊत,प्रदिप जगताप,जगदिश कदम,प्रदीप कंद,नाना जाधव,सुभाष हिरेमठ,आदीसह कारखान्याचे संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तावित कार्याध्यक्ष विकास रासकर यांनी तर आभार कारखान्याचे मुख्याधिकारी डीएम रासकर यांनी मानले