कृषीपुणे जिल्हा ग्रामीण

संतराज महाराज पालखी रथ ओढणार पिंपळगाव येथील नंद माणिक हि बैलजोडी

राहू (BS24NEWS) श्री क्षेत्र संगम (ता.दौंड) येथील संतराज महाराज संस्थानची आषाढी वारीसाठी पालखीचा रथ नंद माणिक हि बैलजोडी ओढणार आहे. पिपंळगाव (ता.दौंड) येथील प्रगतीशिल बागाईतदार खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष नारायण रामचंद्र जगताप यांना यावर्षी बैलजोडी पालखी रथास जुपण्याचा मान यावर्षी संस्थानच्या विश्वस्तांनी दिला.

बैलजोडी खिलार जातीची,पांढरीशुभ्र व रुबाबदार आहे.सदर बैलजोडी बोरगाव येथील प्रगतशील बागातदार सुरेश ताकवणे यांच्याकडून जगताप यांनी घेतली आहे.बैलजोडीचे पूजन संतराज महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश महाराज साठे,दौडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी केले.यावेळी संस्थानचे अध्यक्ष सुरेश महाराज साठे म्हणाले की, पालखीसोहळ्याचे वे वर्ष असुन यावर्षी सोहळा 25 जुन रोजी पंढरपुरकडे रवाना होणार आहे.

या कार्यक्रमास जि. प. सदस्य विरधवल जगदाळे, राणीताई शेळके, नितीन दोरगे, शामभाऊ जगताप, सुभाष बोत्रे, के. खाडे, झुंबर गायकवाड, सयाजी ताकवणे, संजय थोरात, शिवाजी वाघोले आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!