पुणे जिल्हा ग्रामीणमनोरंजन

शंभो महादेव पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान.

१४ गावांमध्ये मुक्काम, दोन वर्षानंतर होणाऱ्या पालखी सोहळ्याला अनेक वारकऱ्यांची उपस्थिती

राहू (BS24NEWS) – राहू (ता.दौंड) येथील शंभो महादेव पालखी सोहळ्याचे ज्ञानोबा तुकाराम हरीनामाचा गजर करत मोठ्या भक्तीमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. राहू गावचे ग्रामदैवत शंभो महादेव पालखी सोहळ्याचे यंदा अकरावे वर्ष आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा बंद असल्याने अनेक वारक-यांचा हिरमोड झाला परंतु यंदा वारक-यांमध्ये उत्साह वाढला होता.अभिषेक,विधीवत पुजा, विणा आणि पादुका पूजन केल्यानंतर टाळ,मृदगांच्या गजरात सवाद्य भव्य आकर्षक स्वरुपात मिरवणुक काढण्यात आली.

शंखनाथ महाराजांची उणीव जाणवली….
दरवर्षी पालखी सोहळा सिद्ध सदगुरु शंखनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे मार्गस्थ होतो.महाराजांच्या तसेच वारीतील प्रत्येक कार्यात हिरीरीने सहभाग नोंदवणारे श्रीकृष्ण उर्फ बापू चौधरी महाराज यांच्या निधनाने सोहळ्यात यंदा फार मोठी पोकळी जाणवत असल्याची खंत वारकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

यावेळी ग्रामस्थांनी घरासमोर सडा, रांगोळीच्या पायघड्या घालत स्वागत करण्यात आले.आषाढी महावारीसाठी मानाची बैलजोडी टेळेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी अर्जुन आबासो थोरात यांची असून मानाचा अश्व बापुसो धनाजी सोनवणे यांचा आहे. पालखी सोहळा पिंपळगाव, खुटबाव, भांड़गाव, मुर्टी, मोरगाव, वाकी, होळ, फलटण, बरड़, नातेपूते, माळशिरस, वेळापूर, वाखारी आदी गावांमध्ये चौदा मुक्काम करीत पंढरपूर येथे पोहोचणार आहे.प्रास्ताविक सतीश टिळेकर यांनी तर आभार भगवान झरांडे यांनी मानले. यावेळी माजी आमदार रंजना कुल, भाजप नेत्या कांचन कुल, सरपंच दिलिप देशमुख, माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, कैलास गाढवे, बंडोपंत नवले, किसन शिंदे, मारुती मगर, कांतीलाल काळे यांच्यासह भाविक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!