संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे दौंड तालुक्यात आगमन, फुलांची उधळण करीत नागरिकांनी केले जल्लोषात स्वागत
यवत (BS24NEWS) जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज साडेचार वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केला. ग्रामपंचायत बोरीभडकच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी हि पालखीचे स्वागत केले.यावेळी फुलांची उधळण करत पालखीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रंजना कुल, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुल, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, राणी शेळके, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस,दौंडचे तहसिलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे ,यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार आदि उपस्थित होते.