दौंड नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर १६३ हरकती
दौंड(BS24NEWS)
दौंड नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर १६३ हरकती हरकत घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्राप्त झाल्या असल्याची माहिती दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी दिली.
याबाबत मुख्याधिकारी राशीनकर म्हणाल्या की , दौंड नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील यादीवर दि.२७ जून पर्यंत हरकती नोंदविण्याचा शेवटचा दिवस होता .या दिवसापर्यंत एकूण १६३ हरकती विविध नागरिकांनी नोंदविल्या आहेत नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन , चार व पाच या प्रभागातील मतदार यादीवर सर्वात जास्त हरकती प्राप्त झाल्या आहेत. तसेच त्या खालोखाल प्रभाग क्रमांक बारा व तेरा यामध्ये देखील हरकती आलेल्या आहेत. या प्रारूप मतदार यादीवर घेण्यात आलेल्या हरकतींची खात्री करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून यावर निर्णय घेऊनच एक जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दौंड नगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून प्रभाग रचना आरक्षण यानंतर आता मतदार यादी निश्चित करण्याचा कार्यक्रम सुरू आहे .यामुळे आगामी काही दिवसातच नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे .