कांचन कुल यांच्या प्रयत्नांमुळे तृतीयपंथीयांना मिळाली कोविड लस…
दौंड प्रतिनिधी(BS24NEWS)
समाजातील सर्व घटकांना कोविड लसीकरण करण्यात येत असून बहुतांश नागरिकांचे बूस्टर डोस देखील झाले आहेत. मात्र दौंड तालुक्यातील काही तृतीयपंथीय नागरिकांचे लसीकरण झाले नसल्याची बाब भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हाध्यक्षा कांचन कुल यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्व. आ. सुभाष अण्णा कुल यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधत राहू येथे तृतीयपंथीय नागरिकांसाठी कोविड लसीकरण कॅम्पचे आयोजन केले.
स्व.आमदार सुभाष अण्णा कुल यांच्या 21व्या पुण्यस्मरणानिमित्त राहू (ता.दौंड) येथे अभिवादन करण्यात आले. तालुक्यातील तृतीयपंथीय नागरिकांसाठी राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कांचन कुल यांच्या पुढाकाराने यवत येथील दहा तृतीयपंथीयांचे कोवीड लसीकरण करण्यात आले.
समाजातील तळागाळापर्यंत सर्व योजना पोहचल्या पाहिजेत. असा स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल यांचा निर्धार असायचा.
कोविड लसीकरण सर्व स्तरात करण्यात येत असताना तृतीयपंथीय नागरिक अनेक ठिकाणी वंचित राहिले असल्याची बाब कांचन कुल यांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी पाठपुरावा करून त्यांचे लसीकरण देखील केले. त्याबद्दल तृतीयपंथीय नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी दीपा गुरु रंजिता नायक,अन्वर गुरु तारा,गौरी गुरु पल्लवी,आचल गुरु दिव्या, ममता गुरु गौरी आदी तृतीयपंथीयासह विविध मान्यवर व राहू प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.