पुणे(BS24NEWS)
राज्यातील जिल्हा परिषदांच्या गटांच्या आणि पंचायत समित्यांच्या गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने दि.५ जुलै रोजी जाहीर केला आहे .
यानुसार दि. १३ जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्याचा आदेश निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा परिषदांचे आरक्षण संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात तर, पंचायत समित्यांचे आरक्षण हे संबंधित तालुक्याच्या ठिकाणी जाहीर केले जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी केवळ संवर्गनिहाय महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तीनच संवर्गांचे आरक्षण जाहीर करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत . यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या एकूण जागांपैकी निम्म्या जागा या विविध संवर्गातील महिलांसाठी आरक्षित केल्या जाणार आहेत. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीचे (एस.टी.) आरक्षण हे संबंधित प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार उतरत्या क्रमाने निश्चित केले जाणार आहेत.