राजकीयराज्य

नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर,१८ ऑगस्टला मतदान

मुंबई(BS24NEWS)
राज्यातील १७ जिल्ह्यांमधील तब्बल ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. पर्जन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज दि.८ जुलै रोजी सायंकाळी जाहिर केल्या आहेत.
या निवडणुकीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरु होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असुन दि. १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहीर केले जाणार आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, या निवडणुकीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरु होणार आहे. २० जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी २९ जुलै रोजी जाहिर केली जाणार असून ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.
निवडणुका होणाऱ्या नगरपरिषदा पुढीलप्रमाणे –
अ वर्गातील ६ नगरपरिषदा –
भुसावळ ,बारामती ,बार्शी,जालना ,
बीड ,उस्मानाबाद

ब वर्गातील २८ नगरपरिषदा –
मनमाड ,सिन्नर,येवला ,दौंडाईचा- वरवाडे ,शिरपूर- वरवाडे ,शहादा,अंमळनेर,चाळीसगाव
,कोपरगाव ,संगमनेर ,श्रीरामपूर,चाकण
,दौंड,कराड,फलटण,इस्लामपूर,विटा
अक्कलकोट,पंढरपूर ,अकलूज
,जयसिंगपूर,कन्नड,पैठण, अंबेजोगाई
माजलगाव ,परळी-वैजनाथ ,अहमदपूर
,अंजनगाव- सुर्जी

क वर्गातील नगरपरिषदा –
कुरुंदवाड ,मुरगुड,वडगांव ,गंगापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!