पावसाने भिमानदी दुथडी भरून वाहू लागली , उजनी धरणाच्या पाण्यात वाढ..…..
दौंड(BS24NEWS)
पुणे जिल्ह्यात सध्या धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे व भीमा नदीच्या उपनद्यांना आलेल्या पाण्यामुळे दौंड शहरानजीक भीमानदी दुथडी भरून वाहत आहे. दुथडी भरून वाहत असलेली भीमा नदी पाहण्यासाठी दौंड शहरातील नागरिकांची नदीकिनारी गर्दी होत आहे. याठिकाणी तरुणाई भरून वाहत असलेल्या भीमा नदीचे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत आहेत. बुधवारी सकाळी सहा वाजता दौंड शहराजवळील रेल्वे पुलाजवळ भीमा नदीतील पाण्याचा विसर्ग ४६ हजार ७५५ क्युसेक इतका होता. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे .पाणी वाढत असल्याने नदी काठच्या उपसा योजनेचे विद्युत पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून नदीकाठी विद्युत पंप हलवण्याची शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. सध्या येत असलेल्या पाण्यामुळे उजनी धरणामध्ये पाण्याची वाढ होत आहे.