दौंड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची बदली रद्द करा – संभाजी ब्रिगेड
पुणे(BS24NEWS)
दौंडचे पंचायत समितीचे प्रामाणिक गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांची झालेली बदली रद्द करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारीधिकारी यांना आज दि.२७रोजी निवेदन दिले आहे. संभाजी ब्रिगेड चे दौंड तालुका अध्यक्ष सुनिल पासलकर यांनी हे निवेदन दिले आहे.
गटशिक्षण अधिकारी भुजबळ यांनी आपल्या अत्यअल्प कार्यकाळात दौंड तालुक्यातील बेकायदेशीर शाळांना टाळे ठोकून दंडात्मक कारवाई करून शासकीय नियमानुसार कार्यवाही करण्यास भाग पाडले आहे, तर अनेक नियम बाह्य काम करणारे शिक्षक व संस्था चालक कारवाईच्या रडारवर आहेत. शासनाच्या प्रचलीत शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात बदल होण्याची गरज आहे, आणि तो बदल गटशिक्षणाधिकारी भुजबळ यांच्या माध्यमातून होवू शकतो. त्यामुळे भुजबळ यांची बदली रद्द करण्यासाठीची मागणी जोर धरत आहे. तर याबाबत अनेकांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही संपर्क साधत बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.
तसेच अनेक सामाजिक संघटना याबाबत आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. बदली रद्द न झाल्यास आंदोलने होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
गटशिक्षणाधिकारी भुजबळ यांची लोकप्रियता व तळागाळातील सर्वसामान्य घटकांचा विचार करुन काम करण्याची पद्धत पाहता पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात याकडे तालुक्यातील शिक्षण प्रेमी चे लक्ष लागले आहे.