उजनी संपादित क्षेत्रातून माती चोरी प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षासह दोन जणांवर गुन्हा दाखल……
राजेगाव(BS24NEWS)
नायगाव (ता. दौंड) येथील गट नं. दहा उजनी संपादित क्षेत्रातून एकशे पाच ब्रास माती चोरी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे माजी दौंड तालुकाध्यक्ष मिलिंद शिवाजी मोरे, मुकेश शिवाजी मोरे, जेसीपी मालक सागर विलास जाधव यांच्यावर खाण व खनिज अधिनियम पर्यावरण अंतर्गत दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मलठणचे गाव कामगार तलाठी नंदकुमार खरात यांनी दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
नायगाव(ता. दौंड) येथील उजनी संपादित क्षेत्रातून माती चोरी होत असल्याची बातमी दि.२२ जुलै रोजी मिळताच रात्री साडेअकराच्या सुमारास खाजगी वाहनाने मंडल अधिकारी मंगेश नेवसे, तलाठी नंदकुमार खरात,कोतवाल रोहिदास कांबळे,पोलीस पाटील प्रभाकर पालेकर यांनी पाहणी केली असता आरोपी हे उजनी संपादित क्षेत्रातून माची चोरी करत असल्याचे आढळून आले आहे . सदरील गट क्र दहा मधून माती चोरी केलेल्या खड्ड्याचे पंचनामे यामध्ये एकशे पाच ब्रास माती चोरी केल्यामुळे शासकीय नियमानुसार तीन लाख पंधरा हजार रुपये दांडाची करावाई केली आहे . याप्रकरणी पुढील तपास दौंड पोलिस करीत आहेत.
सदरील कारवाई मुळे या परिसरातील माती चोरांचे धाबे दणाणले आहेत . पुढील काळात या भागात कोणी माती चोरी केली तर अशीच कारवाई केली जाईल असे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.