स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दौंड एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून पडवी गावात विविध उपक्रम…
दौंड(BS24NEWS)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून पुणे जिल्हा परीषद अंतर्गत दौंड पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून पडवी ग्रामपंचायत अंर्तगत येणाऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये सहा वर्षाच्या खालील बालकांना स्वातंत्र्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने लहान मुलांनी महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी वेशभूषेतून मुलांना स्वातंत्र्याच्या इतिहासा बाबतचा उलगडा करून देण्यात आला.दौंड तालुक्यातील विविध अंगणवाडी केंद्रामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सुरवात झाली आहे.केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत ज्या योजना राबविण्यात येतात त्याबाबत पडवी ग्रामस्थांसाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचबरोबर पोषण अभियान,लसीकरण, बेटी-बचाव,बेटी-पढाव,गरोदरमातांची काळजी याबाबत अंगणवाडी सेविकांनी माहीती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून दौंड गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे नियोजन आणि मार्गदर्शन बालविकास प्रकल्प अधिकारी अक्षदा शिंदे यांनी केले.यावेळी कृषी अधिकारी झरांडे,पंचायत समिती कार्यालयीन अधीक्षक पी.एस.कुंभार, माजी जिल्हाधिकारी भरत शितोळे,सरपंच नागेश मोरे, उपसरपंच राजेंद्र शितोळे,ग्रामपंचायत सदस्य,सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तर कार्यक्रमाची अंमलबजावणी पर्यवेक्षिका अर्चना जाधव आणि शोभा गायकवाड यांनी केले.