पुणे जिल्हा ग्रामीण
कुसेगाव येथील स्वयं सहायता महिला बचत गटाला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान
पुणे(BS24NEWS)
राज्य मोहिम २०२२-२३ अंतर्गत माजी सैनिकांच्या विधवा, पत्नीसाठी महिला बचत गट नोंदणी अभियानांतर्गत दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील स्वयं सहायता महिला बचत गटाला जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजय पवार यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या अभियानांतर्गत वीर नारी, माजी सैनिकांच्या विधवा, पत्नी यांनी नविन महिला बचत गटांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन पवार यांनी आवाहन केले आहे.