पुणे जिल्हा ग्रामीणपुणे शहरराजकीय

विकासकामांसाठी शासन पाठीशी, जनहिताची कामे थांबणार नाहीत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे(BS24NEWS)

पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी. विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, विविध विभागांचे राज्य आणि विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम त्वरित पूर्ण करावे. शासनाच्या मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. दरड प्रवण गावातील तात्पुरते स्थलांतर केलेल्या नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्यात याव्यात. प्राणहानी व घरांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आवश्यक निधीची मागणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले .

या बैठकीस माजी मंत्री तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राहुल कुल,दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, संग्राम थोपटे, महेश लांडगे, सुनिल कांबळे, अशोक पवार, चेतन तुपे, सुनील टिंगरे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अंकुश शिंदे, विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागातील इतर अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

प्रारंभी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे आगमन झाल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचे विभागीय आयुक्त राव यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाच्यावतीने स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!