दौंड काँग्रेसचे महागाई व शेतकऱ्यांच्या समस्याबाबत तहसीलदारांना निवेदन
दौंड (BS24NEWS)
दौंड काॅंग्रेस कमिटीच्यावतीने वाढत्या महागाईच्या विरोधात दौंड तहसीलदारांना निवेदन देवुन आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महागाईच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार आज दि.५ रोजी दौंड काॅंग्रेस कमिटीच्या वतीने महागाई ,जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वर वाढवलेला जीएसटी , अग्निपथ योजना व शेतकऱ्यांच्यावर अवकाळी पावसामुळे नुकसान ओढवले आहे त्यांची नुकसान भरपाई मिळावी , पशुखाद्यचे भाव कमी करावेत , फळबागा ना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी अशा विविध मागण्याचे निवेदन दौंड चे तहसिलदार संजय पाटील यांना देण्यात आले.
यावेळी दौंड विधानसभा काँग्रेस चे अध्यक्ष विठ्ठल दोरगे ,शहर उपाध्यक्ष महेश जगदाळे, तालुका महासचिव प्रकाश सोनवणे ,अॅड अजयकुमार डेंगळे ,सोमनाथ सोडनवर , नागेश फडके , पोपट गायकवाड , श्रावण वाघमारे ,अक्षय ओहोळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.