शेतकऱ्यांसाठी “खुशखबर” जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभाच्या योजनेस प्रारंभ
पुणे (BS24NEWS)
पुणे जिल्हा परिषदेच्या कृषि विभाग मार्फत जिल्हा परिषद निधीअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविणेत येत आहेत. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना राबविताना शासनाच्या ५ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार थेट लाभ हस्तांतरण (DBT) या पध्दतीने राबविणेत येणार आहेत. कृषि विभागाच्या विषय समितीने निश्चित केलेल्या अटी व शर्तीनुसार पात्र असणाऱ्या व अंतिमतः मान्यता दिलेल्या पात्र व गरजू लाभार्थ्यांना विहित बाबींचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सदर योजनेमध्ये ७५% अनुदानावर शेतकऱ्यांना सुधारित अवजारे व साहित्य पुरवठा करणेबाबत पुढील बाबींचा समावेश आहे.
१) ३ एच. पी. ओपनवेल विद्युत मोटार पंपसंच
२) ५ एच. पी. ओपनवेल विद्युत मोटार पंपसंच
३) ७.५ एच. पी. ओपनवेल विद्युत मोटार पंपसंच
४) २ एच. पी. इलेक्ट्रिक कडबाकुट्टी यंत्र मोटारसह (हॉरिझेंटल मॉडेल)
५) ५ एच. पी. डिझेल इंजिन पंपसंच
६) प्लॅस्टिक क्रेट्स २० किलो क्षमता
७) प्लॅस्टिक ताडपत्री (हूक जॉईंट ६६ मीटर)
८) ७५ एमएम पी. व्ही. सी. पाईप
९) ९० एमएम पी.व्ही.सी. पाईप
१०) ७५ एमएम एच.डी.पी.ई. पाईप
११) ट्रॅक्टरचलित दोन फाळी सरीरिजर
१२) बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप
१३) हॉरिझेंटल ट्रिपल पिस्टन स्प्रेपंप ऑईल इंजिनसह
सोलर वॉटर हिटर
सदर योजनांविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली असुन याबाबत सविस्तर माहिती जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ (www.punezp.org) तसेच संबंधित सर्व पंचायत समित्या व ग्रामपंचायतीत उपलब्ध आहे.
विहित निकषांप्रमाणे पात्र लाभार्थ्यांकडून योजनांसाठी दि. २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज कागदपत्रांसहित ऑफलाईन पध्दतीने मागविणेत येत आहेत. विहित मुदतीत अर्ज व कागदपत्रे संबंधित पंचायत समिती कार्यालयात मुदतीत जमा करण्याचे आवाहन दौंड पंचायत समितीचे कृषी अधिकारी एन.टी.जरांडे यांनी केले आहे.