दौंड तालुक्याच्या विकासाचा पन्नास वर्षांचा आराखडा तयार – आमदार राहुल कुल
दौंड (BS24NEWS) – दौंड तालुक्याच्या विकासाचा पुढील पन्नास वर्षांचा आराखडा तयार असल्याचे मत दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले आहे. ते भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात येत असलेल्या हर-घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने आयोजित तिरंगा रॅलीच्या समारोपा वेळी ते बोलत होते .
दौंड तालुका भाजपाच्या वतीने आयोजित या रॅलीमध्ये दौंड तालुक्यातील हजारो युवकांनी सहभाग नोंदवला. यावेळी भारत माता कि जय, वंदे मातरम, जय जवान, जय किसान, अशा घोषणा देण्यात येत होत्या. ही रॅली यवत, भांडगाव, वाखारी, केडगाव, बोरीपार्धी, असा प्रवास करत चौफुला येथे या रॅलीची सांगता होउन तेथे सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना तिरंग्याचे वाटप करण्यात आले.
दौंड तालुका भारतीय जनता पार्टी व आमदार राहुल कुल यांच्या वतीने दौंड तालुक्यातील नागरिकांना सुमारे १०,००० राष्ट्रध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले होते.यवत मधून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. यावेळी आमदार राहुल कूल आणि कांचन कूल हे बुलेटवर या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी आमदार राहुल कूल हे स्वतः गाडी चालवत होते तर कांचन कूल ह्या त्यांच्या पाठीमागे बसल्याचे यावेळी पहायला मिळाले.
यावेळी दौंड तालुका भाजपा अध्यक्ष माऊली ताकवणे, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, भाजप नेते तानाजी दिवेकर, धनाजी शेळके, निळकंठ शितोळे, गोरख दिवेकर, अरुण भागवत, विकास शेलार, मोहन म्हेत्रे, संजय दिवेकर, साहेबराव वाबळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बापूराव भागवत, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अभिमन्यू गिरिमकर, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार कुल म्हणाले की, मी आमदार झाल्यापासून खुटबाव येथील विकास कामांची लिस्ट काढली तर माजी आमदारांपेक्षा नक्कीच जास्त कामे मी केली असतील असे राहुल कुल यांनी सांगितले. तालुक्यातील रेल्वे उड्डाणपूल कामे मंजुरीसाठी आहेत असे देखील सांगितले. यावेळी बोलताना राहुल कुल यांनी आपण केलेल्या कामाची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्ते कमी पडत असल्याचे सांगितले, कामे आपण करायची आणि दंड दुसर्याने थोपटायचे अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले, आपण केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहचवणे कार्यकर्त्यांचे काम आहे तसेच सर्वसामान्यांची कामे करत असताना आपण जनतेचे मालक नसून विश्वस्त आहोत असे सांगत जनसामान्यांच्या कामाला वेळ द्या, मी देखील दर रविवारी ७०० ते ८०० लोकांना भेटून त्यांच्या तक्रारी ऐकून त्यांच्या तक्रारीचे निवारण करत असतो, दर रविवारी तक्रार निवारण दिवस घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणारा एक आमदार दाखवा असा सवाल यावेळी आमदार कुल यांनी उपस्थित केला.
प्रा. दिनेश गडधे यांनी सुत्रसंचलन केले तर बापूराव भागवत यांनी आभार मानले