पुणे जिल्हा ग्रामीण

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मशाल व तिरंगा यात्रा संपन्न

दौंड (BS24NEWS)
दौंड शहरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मशाल व तिरंगा यात्रा काढण्यात आली. दौंड शहरातील प्रमुख रस्त्यांवरून या यात्रे मधील सामील कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्याचा जयजयकार करत स्वातंत्र्य वीरांचा जयघोष केला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज दि.१४ रोजी सायंकाळी सात वाजता राजश्री शाहू महाराज चौकातून या यात्रेला प्रारंभ होऊन संविधान सभा जवळ राष्ट्रगीत गाऊन या यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी विभागाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विरधवल जगदाळे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, महिला तालुकाध्यक्ष योगीनी दिवेकर, युवकचे अध्यक्ष विकास खळदकर, प्रशांत धनवे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!