पुणे जिल्हा ग्रामीणशैक्षणिक

सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मान्यता

केडगाव(BS24NEWS)
केडगाव(ता.दौंड) येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयामध्ये मानव विज्ञान विद्याशाखांतर्गत मराठी, इतिहास, अर्थशास्त्र (एम ए), वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखांतर्गत एम कॉम, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखांतर्गत अनालॅटिकल केमिस्ट्री, आरगाॅनिक केमिस्ट्री एम एस्सी या अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शासन मान्यता मिळाली आहे. सदर अभ्यासक्रमामुळे केडगाव परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व विशेषता विद्यार्थिनींना पुण्यामध्ये मिळणारे खर्चिक उच्च शिक्षण केडगाव मध्येच उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागामध्ये पदव्युत्तर वर्गांचे दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून विद्यार्थी व पालकांची होती. त्यानुसार महाविद्यालयाचे प्रा. प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव तसेच त्यांचे सहकारी डॉ.अशोक दिवेकर, प्रा. डॉ.भाऊसाहेब गव्हाणे, डॉ.महादेव थोपटे, डॉ.भाऊसाहेब दरेकर, राजेंद्र कुमार देशमुख यांनी शासकीय पातळीवरील सर्व कामाची पूर्तता केली. मात्र शासकीय मंजुरीसाठी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी सतत पाठपुरावा केला तसेच अभ्यासक्रम मंजुरीसाठी परिश्रम घेतले. महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके, सचिव धनाजी शेळके, कार्याध्यक्ष अशोक आप्पा शेळके व सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी दिले.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!