पुणे जिल्हा ग्रामीण
दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी दिवेकर यांचे निधन
दौंड(BS24NEWS)
दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी दिवेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच तालुक्यात सर्वच स्थरातून दुःख व्यक्त केले जात आहे. आमदार राहुल कुल यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची तालुक्यात ओळख होती.एक दानशूर व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. कै.दिवेकर हे दरवर्षी नागरिकांसाठी अष्टविनायक यात्रा, क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करीत असून त्यांचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग असायचा.
कै.शिवाजी दिवेकर यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे.