पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय

खामगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी तुषार बहिरट बिनविरोध

यवत(BS24NEWS)

खामगांव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी तुषार धनंजय बहिरट यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खामगांव ग्रामपंचायत मधील कैलास खेडेकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.

खामगांव ग्रामपंचायत कार्यालय येथे निवडणूक घेण्यात आली .

उपसरपंच पदासाठी तुषार बहिरट यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे उपसरपंचपदी तुषार बहिरट यांची बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली .निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक पि. बी. नाळे यांनी या निवडीचे कामकाज केले .या निवडीप्रसंगी सरपंच व सर्व सदस्य आदी उपस्थिती होते.

बहिरट यांच्या निवडीने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!