पुणे जिल्हा ग्रामीणपुणे शहर
पुण्यातील मिरवणूकींचा थाटच न्यारा…… पुढच्या वर्षी लवकर या ! म्हणत लाडक्या बाप्पाला निरोप
सर्वत्र विसर्जन मिरवणुकीची धूम पाहुण्या आलेल्या बाप्पाला भक्त जड अंतकरणाने निरोप
BS24 NEWS – गणपती बाप्पा मोरया… पुढल्या वर्षी लवकर या असे आपल्या लाडक्या बाप्पाकडून वचन घेत गणपतीचे विसर्जन करण्यात येत आहे. दोन वर्ष कोरोनाच्या सावटानंतर यंदा गणोशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. पहिल्या दिवसांपसून लोकांचा उत्साह पाहायला मिळत होता. आपल्या भक्तांकडून मनोभावे सेवा करुन घेतल्यानंतर आज पाहुण्या आलेल्या बाप्पाला भक्त जड अंतकरणाने निरोप देत आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागासह, मुंबईत देखील ठिकठकाणी पारंपारीक पद्धतीने बाप्पाची मिरवणुक काढत ढोल – ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.