गुलामीचे चिन्ह मिटले..राजपथचे नाव आता ‘कर्तव्य पथ’
पंतप्रधान म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाने देशाला एक नवी प्रेरणा मिळाली आहे
दिल्ली (BS24NEWS) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे उद्घाटन केले. आता राजपथ ‘कर्तव्य पथ’ म्हणून ओळखला जाणार आहे. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरणही केले. या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे उद्घाटन केले. आता राजपथ ‘कर्तव्य पथ’ म्हणून ओळखला जाणार आहे. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरणही केले. या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले.
काय म्हणाले संपूर्ण भाषणात पंतप्रधान मोदी?
‘कर्तव्य पथ’ वर बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गुलामगिरीचे प्रतीक असलेला राजपथ आजपासून इतिहासाचा विषय आहे. तो आता पुसला गेला आहे. एका प्रतीकातून बाहेर पडल्याबद्दल मी देशातील सर्व जनतेचे अभिनंदन करतो. हा भारताच्या लोकशाही भूतकाळाचा जिवंत मार्ग आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेल्या सर्व देशवासियांचे मी मनापासून स्वागत करतो.
पुढे ते म्हणाले की, “गेल्या आठ वर्षात आम्ही असे अनेक निर्णय घेतले त्या निर्णयावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची छाप होती. अंदमान आणि निकोबार बेटांवर राष्ट्रध्वज फडकवणारे ते ‘अखंड भारत’चे पहिले प्रमुख होते. आज इंडिया गेटजवळ आपले राष्ट्रीय महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही मोठा पुतळा बसवण्यात आला आहे. गुलामगिरीच्या वेळी ब्रिटीश राजवटीच्या प्रतिनिधीचा पुतळा होता. आज त्याच ठिकाणी नेताजींच्या पुतळ्याची स्थापना करून देशाने आधुनिक, सशक्त भारताचे जीवनही प्रस्थापित केले आहे, असे बोलताना पंतप्रधान मोदींनी भावना व्यक्त केली.