क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचे कार्य कायम स्मरणात राहील – माजी आमदार श्रीमती रंजना कुल
राहू (BS24NEWS) – राजे उमाजी नाईक हे क्रांतिकारक, प्रखर देशभक्त आणि युद्धनीती निपुण असे थोर क्रांतिकारक होते. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्धच्या बंडाची घोषणा करून त्यांनी देशाप्रती केलेले महान कार्य कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन माजी आमदार रंजना कुल यांनी व्यक्त केले.
गलांडवाडी तालुका दौंड येथे उमाजी नाईक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात उमाजी नाईक जयंती व गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार रमेश थोरात, वैशाली आबणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना माजी आमदार कुल म्हणाल्या की रामोशी समाज हा एक लढवय्या समाज असून उमाजी नाईक यांचे कार्य सदैव प्रेरणादायी आहे.
यावेळी सुमारे १४० हून अधिक बाटल्या रक्त संकलित करण्यात आल्या, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा वैशाली आबणे म्हणाल्या की, उमाजी नाईक क्रांतिवीर प्रतिष्ठानचे कार्य कौतुकस्पद असून त्यांना पुढील समाजकार्यासाठी शुभेच्छा.
यावेळी माजी सरपंच ज्योती संदीप शितोळे, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक प्रतिष्ठान अध्यक्ष धनंजय चव्हाण, निलेश जाधव, अनिकेत पायगुडे, मंगेश रायकर, गौरव मुळीक, बाबाजी जाधव, आकाश चव्हाण, सुरज चव्हाण, माजी सैनिक रोहिदास चव्हाण, अन्वर पठाण, संदीप मुळीक, आकाश मुळीक, सुभाष शितोळे, अक्षय कदम, मंथन मुळीक, रयत शेतकरी संघटनेचे दौंड तालुका कार्याध्यक्ष गौरव चव्हाण उपस्थित होते.