पाटस रेल्वे स्टेशन गेट नंबर १५ ला भुयारी मार्गाऐवजी उड्डाणपूल बांधण्याबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन
रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी मेलद्वारे निवेदन पाठवत केल्या विविध मागण्या
पाटस (BS24NEWS) दौंड तालुक्यातील पाटस रेल्वे स्टेशन गेट नं. १५ वरील भुयारी मार्गाचे काम चुकीचे झाले आहे. येथे भुयारी मार्गाऐवजी रेल्वे मार्गाऐवजी उड्डाणपूल बांधण्यात यावा अशी मागणी पत्राद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे रयत क्रांती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास शिंदे यांनी केली आहे .
या निवेदनात पुढील बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत – दौंड तालुक्यातील पाटस येथील रेल्वे स्टेशन गेट नं. १५ गेली, १२ महिने झाले बंद आहे . करण सदर ठिकाणी भुयारी मार्गाचे काम चालू आहे. सदर भुयारी मार्ग हा भौगोलिक दृष्ट्या पूर्णता चुकीचा झालेला आहे .कारण सदर ठिकाणी रेल्वे लाईन खाली इंग्रजकालीन पाणी जाण्यासाठी भुयारी मोरी होती. त्याच ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्याचे काम चालू आहे.
जमीन सपाटीपासून सदर मार्ग हा १५ ते २० फुट खोल जाणार असून सदर मार्ग वळणावर होत आहे. त्यामुळे पाऊसामध्ये सदर भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचणार असून, वळणाकार भुयारी मार्गामुळे अपघाताचे प्रमाण वाढणार आहे. पावसाळ्यात भुयारी मार्गामध्ये ४ महिने पाणी राहणार आहे तसेच रात्री अपरात्री सदर ठिकाणाची वाहतूक गैरसोयची व असुरक्षित होणार आहे. त्यामुळे सदर ठिकाणी भुयारी मार्ग ऐवजी उड्डाणपूल करण्यात यावा हि अशी मागणी या लेखी निवेदनात रयत क्रांती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास शिंदे यांनी केली आहे. हे निवेदन मेल द्वारे पाठवण्यात आले आहे .