खडकीच्या सरपंचपदी सविता शितोळे बिनविरोध
दौंड(BS24NEWS)
खडकीच्या सरपंचपदी सविता शितोळे यांची बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश भालेराव यांनी केली.
ग्रामपंचायत खडकीच्या माजी सरपंच स्नेहल काळभोर यांचा आपसात ठरल्याप्रमाणे त्यांनी १५ऑगस्ट रोजी राजीनामा दिला होता . त्यानुसार आज दि.२३रोजी सरपंच पदाची निवडणूक प्रकिया ग्रामपंचायत कार्यालयात सुरू झाली. यावेळी अर्ज भरण्याच्या मुदतीत सौ.सविता दत्तात्रय शितोळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश भालेराव यांनी जाहीर केले.
यावेळी बोलताना नवनियुक्त सरपंच सविता शितोळे म्हणाल्या की,गावाच्या विकासासाठी हवे दावे बाजूला ठेवून गावातील विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे सांगितले.
यावेळी आजी माजी सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.