भाजपात घराणेशाहीला थारा नाही – निर्मला सीतारामन
राहू(BS24NEWS)
भारतीय जनता पार्टी हा पक्ष घराणेशाहीच्या विरोधात काम करणारा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातीपासून अनेकांनी या पक्षाचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच पंतप्रधानपद देखील भूषवले आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून भाजपात घराणेशाहीला थारा नाही. त्यामुळे बारामतीच्या जनतेने आता विचार करावा असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या शनिवार (ता.24)रोजी बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर होत्या. दौंड तालुक्यातील राहू येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वृक्षारोपण करत पदयात्रा काढली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी माजी मंत्री राम शिंदे, हर्षवर्धन पाटील,बाळा भेगडे,माजी आमदार रंजना कुल,आमदार राहुल कुल,गणेश भेगडे,कांचन कुल, अविनाश मोटे,आदी उपस्थित होते.
यावेळी त्या म्हणाल्या की,पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांच्या सर्वांगीण, सामान विकासासाठी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची जनता हुशार आहे. महाराष्ट्र मध्ये नवनवीन उद्योग व्यवसाय यावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.
राजकारणामध्ये संधी साधू लोकांची संख्या वाढली असून अशा संधी साधू लोकांच्या हातात सरकार गेल्यानंतर काय होतं हे महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवलं आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री, केंद्रीय कृषिमंत्री अशी पदे बारामतीच्या प्रतिनिधींनी भूषवली असताना घराणेशाही व भ्रष्टाचारामध्ये अडकलेल्या या नेत्यांनी जनतेची चिंता का केली नाही, असा सवाल यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांचे नाव न घेता उपस्थित केला.