बॉम्ब शोधन पथकातील श्वान शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा …..
केडगाव(BS24NEWS)
पिंपळगाव (ता. दौंड) येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यापुर्वी बॉम्ब शोधक व प्रतिबंधक पथकातील श्वानाने जिल्ह्यातील सर्व सोशल मीडियातील कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले. बॉम्ब शोधन पथकातील शॉन शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला.
पिंपळगाव येथे सितारामन यांच्या दौऱ्याचा शेवट जिल्ह्यातील भाजपा सोशल मीडियाच्या बैठकीने झाला.यावेळी सहा विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते सभागृहात उपस्थित होते व निर्मला सीतारामन यांची वाट पाहत होते. दौऱ्याच्या सुरक्षेसाठी असलेल्या पथकातील श्वान
सितारामन यांच्या आगमनापूर्वी काही मिनिटे अगोदर कार्यक्रम स्थळी पोलिसासोबत आला. त्यानंतर त्याने व्यासपीठावर सर्व सुरक्षेची चाचणी केली. त्यानंतर श्वानाचे लक्ष शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे गेले.पुतळा पाहताच सदर श्वान चार पायावर खाली बसला व शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाला.सदर क्षण सोशल मीडियातील शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये अलगद टिपला. कार्यक्रम संपल्यानंतर या फोटोची चर्चा सोशल मीडियावर सगळीकडे रंगली. अनेकांनी सदर फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले.