देलवडी येथे कर्मवीर जयंती उत्साहात साजरी
केडगाव (BS24NEWS)
देलवडी (ता.दौंड) येथे रयत शिक्षण संस्थेच्या जय मल्हार विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या बैलगाडीच्या मिरवणुकीसमोर विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व ढोल पथकाने आपला कलाविष्कार दाखवला. प्रमुख पाहुणे साधनाचे माजी प्राचार्य विजय शितोळे म्हणाले की ,कर्मवीर भाऊराव पाटील हे चालते बोलते विद्यापीठ होते.’ स्वावलंबी शिक्षण हेच ब्रीद’ हे विचार अनेक विद्यार्थ्यांनी अंगिकारल्यामुळे अनेक विद्यार्थी घडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाळासाहेब वाघोले होते. यावेळी विसाखा कंपनीचे रत्नाकर महाजन म्हणाले की, भविष्यामध्ये कंपनीच्या सीएसआर फंडामधून देलवडी गावची अनेक विकास कामे केली जातील. गोपीनाथ शेलार यांनी विद्यार्थ्यांना बैलगाडी उपलब्ध करून दिली तर माऊली वाघोले यांनी अन्नदान दिले.यावेळी विद्यालयाच्या वतीने वर्षभर पाणी उपलब्ध केल्याबद्दल अनिल शेलार यांचा तर पीएचडी झाल्याबद्दल डॉ. विकास टकले व डॉ. मोहन शेलार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवाजी भाडळे, मुख्याध्यापक रामचंद्र नातू, सरपंच निलम काटे,राजाराम शेलार, यांनी मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाला शाला व्यवस्थापन समितीचे सदस्य विकास शेलार ,दत्तात्रय शेलार,विठ्ठल शिशुपाल मुख्याध्यापक सतीशचंद्र पाटील व ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते. संयोजन पुरुषोत्तम लोंढे हर्षल देशमुख, शरद बोंबे,दिपक शिशुपाल यांनी केले.