पुणे जिल्हा ग्रामीण
आलेगावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी सचिन कदम
दौंड(BS24NEWS)
महात्मा गांधी तंटामुक्त गाव आलेगाव च्या अध्यक्षपदी सचिन सुभाष कदम व उपाध्यक्षपदी शिवाजी गुलाब ढमढेरे यांची बहुमताने निवड झाली. आलेगावच्या सरपंच तृप्ती राहुल काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ही निवड झाली.
यावेळी उपसरपंच मानसी महेंद्र चितारे, ग्रामसेवक मोहन मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य अनिता धुमाळ, प्रणाली चितारे, अनिता कदम, निलम इंगवले, हंबीरराव धुमाळ, कामगार युनियनचे माजी अध्यक्ष शिवाजी काळे, नंदकुमार काळे, महेश काळे, अंबादास काळे, राहुल काळे, कांतीलाल काळे, बाळकृष्ण इंगवले,बाळासाहेब कदम, वसंत धुमाळ, अनिकेत चितारे, बाळु काळे किरण कदम ,राजेंद्र वाघ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कदम हे दौंड तालुका कुस्तीगीर संघाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत .