पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी
28 सप्टेंबर ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन
पुणे(BS24NEWS)
माहिती अधिकार दिन 28 सप्टेंबर हा दिवस जिल्हा परिषद, पोलीस विभाग, महानगरपालिका, महसूल विभाग आदी शासकीय विभागांच्या क्षेत्रीय कार्यालयांनी विविध उपक्रमांचे आयोजन करुन साजरा करावा, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.
माहिती अधिकार दिनानिमित्त ‘माहितीचा अधिकार’ या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यानमाला असे उपक्रम आयोजित करण्यात यावेत. या उपक्रमास व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी. आपल्या कार्यालयात माहिती अधिकार अधिनियम बाबत उपक्रम राबवावे, असे आवाहन तेली यांनी केले आहे.