पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय

पिंपळगावच्या सरपंच पदी शुभांगी पासलकर

राहू (BS24NEWS)

दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शुभांगी सुनील पासलकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

मंगल नानासाहेब थोरात यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त असणाऱ्या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सरपंच पदासाठी एकमेव शुभांगी पासलकर यांचा अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णयक अधिकारी दादा लोणकर यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामसेवक अशोक लोणकर व गाव कामगार तलाठी बापूसाहेब देवकर यांनी त्यांना सहकार्य केले.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भीमा पाटस कारखान्याचे संचालक चंद्रकांत नातू,दौंड पंचायत समितीच्या माजी सभापती उषा चव्हाण,माजी उपसरपंच अर्जुन जगताप, सचिन थोरात, बापूथोरात, दिगंबर कापरे, नाना थोरात व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले.

दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून गावामध्ये विविध विकास कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच शुभांगी पासलकर यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!