पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी
दौंड उपजिल्हा रुग्णलयात लाचलुचपत विभागाची छापेमारी …….
दौंड (BS24NEWS)
दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्यासह शिपाई खोत यांना लाच घेताना लाचलुचपत विभागाने घेताना रंगे हात पकडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार व्यक्तीचे विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र हरवले असल्याने दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र एका दिवसात देण्यासाठी दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. डांगे व शिपाई खोत या दोघांना पाच हजाराची लाच घेताना पकडले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. दरम्यान, तक्रारदार व लाच स्वीकारणारे यांचे जाबजबाब सुरू असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे.